Doctor Viral Video: वेळेत शस्त्रक्रीया करण्यासाठी 45 मिनिटं धावत सर्जनने गाठलं हॉस्पिटल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

पण रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती बघता डॉ गोविंद नंदकुमार यांनी थेट 45 मिनिटं धावत हॉस्पिटल गाठलं.

Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही दिवसांपासून बंगरुळूमध्ये (Bangalore) धोधो पाऊस कोसळत आहे. शहरातील प्रमुख भागात पाणी साचलं आहे तर रस्त्यावर वाहतूकीचा खोळंबा (Traffic Jam) झाला आहे. बंगरुळूच्या हॉस्पिटलमध्ये (Hospital) सर्जन (Surgeon) म्हणून कार्यरत असलेले डॉ गोविंद नंदकुमार (Dr Govind Nandakumar) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. डॉ गोविंद नंदकुमार यांना क्रिटीकल रुग्णावर (Critical Patient) शस्त्रक्रीया (Surgery)  करण्यास हॉस्पिटलमध्ये (Hospital) पोहोचायचं होत. पण रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे मार्गावर वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान परिस्थिती बघता डॉ गोविंद नंदकुमार (Dr Govind Nandkumar) यांनी थेट 45 मिनिटं धावत हॉस्पिटल गाठलं.