Ganeshotsav 2023: Bengaluru मध्ये बाप्पासाठी 65 लाख किंमतीच्या चलनी नोटा, नाणी वापरून आरास (Watch Video)
Sri Sathya Ganapathy Temple मध्ये गणेशोत्सवासाठी खास सजावट असते. यंदा तर त्यांनी 10 ते 500 रूपयांच्या नोटा वापरून सजावट केली आहे.
गणेशोत्सवाच्या रंगामध्ये सध्या सारा देश न्हाऊन गेला आहे. 19 सप्टेंबर पासून पुढील 10 दिवस बाप्पाच्या सेवेमध्ये भाविक रमणार आहेत. बाप्पासाठी आरास बनवून त्यात त्याला विराजमान करण्यासाठी तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. कर्नाटक मध्ये बेंगळूरू येथे चक्क नोटा आणि कॉईन्सचा वापर करून सजावट केली आहे. ही सजावट 65 लाखांची आहे. बेंगलूरू मधील Sri Sathya Ganapathy Temple मध्ये गणेशोत्सवासाठी खास सजावट असते. यंदा तर त्यांनी 10 ते 500 रूपयांच्या नोटा वापरून सजावट केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)