Snake Found Inside Bike's Helmet: बाप रे बाप! हेल्मेटमध्ये सापडला साप; पहा व्हायरल व्हिडिओ

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हेल्मेट दिसत आहे, हेल्मेटमध्ये काहीही दिसत नाही. पण जेव्हा एक व्यक्ती काठी घेऊन हेल्मेटच्या आतील कपडे काढते तेव्हा दिसणाऱ्या दृश्याने सर्वांना धक्का बसतो. कारण, हेल्मेटच्या आतून एक साप बाहेर येताना दिसत आहे. हेल्मेटमध्ये असलेला साप अतिशय धोकादायक आणि विषारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Snake Found Inside Bike's Helmet (फोटो सौजन्य - X/@imvivekgupta)

Snake Found Inside Bike's Helmet: साप (Snake) हा असा प्राणी आहे की, ज्याला पाहून माणसांची अवस्था बिकट होते. तुमचे रक्षण करणाऱ्या हेल्मेटच्या आत हा साप बसला आणि तेच हेल्मेट तुम्ही डोक्यात घातले तर काय होईल? याची साधी कल्पनाही तुम्ही करू शकत नाहीत. परंतु, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेल्मेटमध्ये साप बसलेला दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हेल्मेट दिसत आहे, हेल्मेटमध्ये काहीही दिसत नाही. पण जेव्हा एक व्यक्ती काठी घेऊन हेल्मेटच्या आतील कपडे काढते तेव्हा दिसणाऱ्या दृश्याने सर्वांना धक्का बसतो. कारण, हेल्मेटच्या आतून एक साप बाहेर येताना दिसत आहे. हेल्मेटमध्ये असलेला साप अतिशय धोकादायक आणि विषारी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ शेअर करून लोक हेल्मेट वापरणाऱ्यांना सावध करत आहेत. तसेच हेल्मेट घालण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासण्याचा सल्ला देत आहेत. (Snake Attack in Karnataka Video: घराच्या दारात पडून असलेल्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावली लहान मुलगी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ (Watch))

पहा व्हिडिओ - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement