Shortest Marriage Ever: ऐकावे ते नवलंच! जोडप्याने लग्नानंतर अवघ्या तीन मिनिटांत घेतला घटस्फोट; जाणून घ्या कारण
वधू ताबडतोब पुन्हा कोर्ट हाउसमध्ये गेली आणि तिने न्यायाधीशांना त्यांचे लग्न तात्काळ रद्द करण्यास सांगितले. वधूचे म्हणणे ऐकून प्रथम न्यायाधीश आश्चर्यचकित झाले, परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांनी होकार दिला आणि तीन मिनिटांनी लग्न रद्द केले.
Shortest Marriage Ever: लग्नाशी संबंधित अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या, ऐकल्या आणि वाचल्या असतील, मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली लग्नाची ही घटना आश्चर्यचकित करणारी आहे. अलीकडेच एका जोडप्याचा लग्नानंतर अवघ्या तीन मिनिटांत घटस्फोट झाला आहे. वृत्तानुसार, हे जोडपे कुवेतमधील आहे. लग्न समारंभ झाल्यानंतर वराने आपल्या वधूचा अपमान केला, त्यानंतर संतापलेल्या वधूने भांडण सुरु केले. वादानंतर दोघांनीही एकमेकांना घटस्फोट दिला. हा विवाह कुवेतच्या इतिहासातील सर्वात कमी काळ टिकणारा विवाह असल्याचे म्हटले जात आहे. मेट्रोच्या अहवालानुसार, लग्नाची औपचारिक प्रक्रिया संपल्यानंतर जोडपे कोर्ट हाउसमधून बाहेर पडले, त्यावेळी वधू अचानक घसरली. वधू पडताच वराने तिला ‘स्टूपीड' म्हटले. वराच्या या वक्तव्यावर वधूचा राग गगनाला भिडला. त्यानंतर वधू ताबडतोब पुन्हा कोर्ट हाउसमध्ये गेली आणि तिने न्यायाधीशांना त्यांचे लग्न तात्काळ रद्द करण्यास सांगितले. वधूचे म्हणणे ऐकून प्रथम न्यायाधीश आश्चर्यचकित झाले, परंतु दुसऱ्याच क्षणी त्यांनी होकार दिला आणि तीन मिनिटांनी लग्न रद्द केले. (हेही वाचा; Sex With Soldiers For Food: अन्नासाठी महिलांना सैनिकांसोबत सेक्स करण्यास भाग पाडले जाते; पोट भरण्यासाठी होतो शरीराचा व्यापार, अहवालात धक्कादायक खुलासा)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)