Rihanna Arrives In Jamnagar: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय स्टार 'रिहाना'चे जामनगर येथे आगमन; सोबत आणलेले सामान पाहून बसेल धक्का (Watch Video)

या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्तींसह चित्रपट, संगीत जगतातील अनेक स्टार्स जामनगर येथे दाखल होत आहेत. नुकतेच या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय गायिका 'रिहाना' आपल्या टीमसह जामनगर येथे दाखल झाली आहे.

Rihanna Arrives In Jamnagar

Rihanna Arrives In Jamnagar: मुकेश व नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचे लग्न राधिका मर्चंट हिच्याशी होऊ घातले आहे. त्याआधी गुजरातच्या जामनगर येथे 1 ते 3 मार्च या कालावधीमध्ये लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जगभरातील अनेक बड्या व्यक्तींसह चित्रपट, संगीत जगतातील अनेक स्टार्स जामनगर येथे दाखल होत आहेत. नुकतेच या सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय गायिका 'रिहाना' आपल्या टीमसह जामनगर येथे दाखल झाली आहे. सध्या सोशल मिडियावर रिहाना घेऊन आलेल्या सामानाची जोरदार चर्चा सुरु आहे. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक छोट्या ट्रॉलीज एका मागून एक जात असलेल्या दिसत आहेत. त्यावर फार मोठ्या प्रमाणात समान पॅक केलेले दिसत आहे. हे सर्व समान रिहानाचे असल्याचे सांगितले जात आहे. या सामानाचा हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. रिहानाच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या कारची झलकही सोशल मीडियावर समोर आली आहे, ज्यावर प्राण्यांचे ठसे दिसत आहेत. रिहानाच्या स्वागतासाठी या खास गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. (हेही वाचा: Disney and Reliance to Merge Media Businesses: देशात मनोरंजन ब्रँड तयार करण्यासाठी रिलायन्स मीडिया आणि वॉल्ट डिस्ने यांच्यात मोठा करार; Nita Ambani असतील अध्यक्ष)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now