Rat Menace In Mumbai-Goa Express Pantry: एलटीटी-मडगाव एक्स्प्रेसच्या किचनमधील अन्नावर आढळले उंदीर; प्रवाशाने शूट केला धक्कादायक व्हिडिओ (Watch)

यानंतर आता पुन्हा भारतीय रेल्वेने केलेल्या स्वच्छतेच्या उपायांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Rat Menace In Mumbai-Goa Express Pantry

भारतीय रेल्वेच्या अन्नाबाबत नेहमीच तक्रारी समोर येत असतात. आता एका लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या पॅन्ट्री कारमध्ये चक्क उंदीर अन्नपदार्थांच्या आजूबाजूला फिरताना तसेच ते अन्न खाताना दिसत आहे. हा भयानक व्हिडिओ बुधवारी सोशल मीडियावर समोर आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एक्स्प्रेस 11009 गाडीच्या पॅन्ट्री कारमध्ये हा उंदीर अन्न खाताना दिसला आहे. यानंतर आता पुन्हा भारतीय रेल्वेने केलेल्या स्वच्छतेच्या उपायांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 15 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली असून, एका प्रवाशाने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या ठिकाणी 6-7 उंदीर असल्याचे प्रवाशाने सांगितले आहे. जेव्हा या प्रवाशाने हा मुद्दा रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून दिला तेव्हा त्याला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. X (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यांनी भारतीय रेल्वेने या समस्येकडे लक्ष देण्याची आणि योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा: AirAsia CEO Tony Fernandes यांचा व्यवस्थापन बैठकीत कपडे काढून Massage, सोशल मीडियावर ट्रोल)

 

View this post on Instagram

 

A post shared by RF Drx. Mangirish Tendulkar (@mangirish_tendulkar)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)