Ram Rahim Music Video: पॅरोलवर बाहेर असलेल्या राम रहीमने दिवाळी निमित्त लाँच केला म्युझिक व्हिडिओ (Watch)
राम रहीमच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जानंतर त्याला गेल्या आठवड्यात 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता.
पॅरोलवर बाहेर आलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरला आहे. आता त्याने एक म्युझिक व्हिडिओ लॉन्च केला आहे, जो सध्या यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 2017 मध्ये राम रहीमला दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. राम रहीमच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या अर्जानंतर त्याला गेल्या आठवड्यात 40 दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर राम रहीमने यूट्यूबवर म्युझिक व्हिडिओ रिलीज केला आहे.
या व्हिडिओचे संगीत, गीत, रचना आणि दिग्दर्शन राम रहीम याने केले आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये राम रहीम दिवा लावताना दिसत आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या सणात जुगार खेळणाऱ्या किंवा दारू पिणाऱ्यांचा तो आपल्या गाण्याच्या माध्यमातून खरपूस समाचार घेत आहे. नुकतेच राम रहीमने बागपत येथील कथा सभेलाही संबोधित केले होते, ज्यामध्ये अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. राम रहीमला पॅरोलवर सोडण्याच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका होत होती. गुरमीत राम रहीमला नेहमीच निवडणुकीपूर्वी सोडले जाते, असे विरोधकांनी म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)