Viral Video: धक्कादायक! प्रसुतीसाठी गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून थरारक प्रवास, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला पूराच्या पाण्यातून खाटेवर बसवून शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Uttarakhand Flood | (Photo Credit: ANI)

देशभरातील विविध राज्यात पाऊस धोधो कोसळत आहे. गेल्या काही दिवसात मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली असुन विविध गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. बेतूल जिल्ह्यातील अनेक गावखेड्यामध्ये पाणी शिरलं आहे. तरी गावखेड्यात आवश्यक त्या वैद्यकीय सोयी उपलब्ध नसल्याने एका गर्भवती महिलेला पूराच्या पाण्यातून  खाटेवर बसवून शाहपूर शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. गर्भवती महिलेचा पुराच्या पाण्यातून थरारक प्रवास सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. तरी प्रशासनाकडून वेळीच दखल घेण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement