Dog Attack in Kanpur: Pitbull ने गायीवर केला हल्ला; 5 मिनिटे दाबून ठेवला जबडा, Watch Video

खुद्द पिटबुलचा मालकही लोखंडी रॉड घेऊन गायीला पिटबुलपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतरही पिटबुल गायीला त्याच्या तावडीतून सोडत नाही.

Dog Attack on Cow (PC - Twitter)

Dog Attack in Kanpur: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आणि गाझियाबादमध्ये पिटबुल (Pitbull) च्या हल्ल्याच्या बातम्या येत असताना, आज कानपूर (kanpur) मध्ये पिटबुलने गायीवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक पिटबुल आपल्या जबड्याने गाईचे तोंड अशा प्रकारे पकडताना दिसत आहे की, अनेक लोकांच्या प्रयत्नांनंतरही तो आपली पकड सोडत नाही.

लाठ्या-काठ्या घेऊन अनेकजण गाईची सुटका करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खुद्द पिटबुलचा मालकही लोखंडी रॉड घेऊन गायीला पिटबुलपासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यानंतरही पिटबुल गायीला त्याच्या तावडीतून सोडत नाही. खूप प्रयत्नानंतर पिटबुलने गायीचा जबडा सोडला. या घटनेत गाय जखमी झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)