Poonch मध्ये पाकिस्तान ने Indian Rafale Fighter Jet एलओसी वर पाडले? PIB Fact Check ने केला खुलासा
खोट्या दाव्यासह शेअर केलेला व्हिडिओ जून 2024 मध्ये महाराष्ट्रात कोसळलेल्या सुखोई-30 MKI लढाऊ विमानाचा आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तानी सोशल मीडिया अकाउंट्स वर खोट्या अफवा पसरवल्या जात आहेत. एका पाकिस्तानला सपोर्ट करणार्या सोशल मीडिया अकाउंटचा दावा करत आहे की पाकिस्तानने काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) एक भारतीय राफेल लढाऊ विमान पाडले आहे. पण PIB ने केलेल्या फॅक्ट चेक मध्ये हे वृत्त खोटे असल्याचे दिसून आले. "पाकिस्तानी सैन्याने कोणतेही भारतीय लढाऊ विमान पाडलेले नाही," PIB ने म्हटले आहे. खोट्या दाव्यासह शेअर केलेला व्हिडिओ जून 2024 मध्ये महाराष्ट्रात कोसळलेल्या सुखोई-30 MKI लढाऊ विमानाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानने पूंछ येथे नियंत्रण रेषेवर एक भारतीय राफेल लढाऊ विमान पाडले ?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)