Noida मध्ये पुन्हा एकदा पाळीव कुत्र्याचा हल्ला; सोसायटीच्या लिफ्टमध्ये लहान मुलाच्या हाताचा घेतला चावा (Watch Video)

लिफ्टमध्ये शिरताच कुत्र्याने मुलाच्या हातावर झडप घातली. यामध्ये मुलगा जखमी झाला.

Dog Barking | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

ग्रेटर नोएडा वेस्टच्या लार्जेसिडिया सोसायटीच्या लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने पुन्हा एका मुलाला जखमी केले. ही घटना मंगळवारी दुपारची आहे. राहुल प्रियदर्शन हा आपल्या कुटुंबासह सोसायटीच्या टॉवर क्रमांक सात फ्लॅट क्रमांक 1302 मध्ये राहतो. शाळा संपल्यानंतर राहुल प्रियदर्शनची पत्नी आपल्या सात वर्षाच्या मुलाला सोसायटीच्या गेटच्या बाहेरून घेण्यासाठी गेली होती. मुलाला घेऊन ती सोसायटीच्या लिफ्टमध्ये चढली. त्यावेळी एक व्यक्ती आपल्या पाळीव कुत्र्यासोबत लिफ्टमध्ये आला. लिफ्टमध्ये शिरताच कुत्र्याने मुलाच्या हातावर झडप घातली. यामध्ये मुलगा जखमी झाला. याआधीही अनेक पाळीव कुत्र्यांनी लिफ्टमधील लोकांना चावल्याच्या घटना घडल्याचा आरोप सोसायटीतील लोकांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now