ओडिया गायक Murali Mohapatra परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर कोसळले; झाले निधन (Watch Video)
मुरली यांचे मोठे बंधू विभूती प्रसाद महापात्रा यांनी सांगितले की, मुरली हे दीर्घकाळापासून हृदयविकार आणि मधुमेहाने त्रस्त होते. त्यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले.
ओडिया गायक मुरली प्रसाद महापात्रा यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ओडिशाच्या जेपोर शहरात एका कार्यक्रमात अचानक बसलेल्या खुर्चीवरून खाली पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरापुट जिल्ह्यातील जेपोर शहरातील राजनगर येथे दुर्गापूजेसाठी आयोजित कार्यक्रमात महापात्रा त्यांची कला सादर करत होते. दोन गाणी गायल्यानंतर ते स्टेजवरील एका खुर्चीवर बसले आणि इतर गायकांची ऐकत होते, यादरम्यान ते खुर्चीवरून खाली पडले.
त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. मुरली यांचे मोठे बंधू विभूती प्रसाद महापात्रा यांनी सांगितले की, मुरली हे दीर्घकाळापासून हृदयविकार आणि मधुमेहाने त्रस्त होते. त्यांचे वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)