Viral Video: 'आजोबांना राईड देण्याची माझी वेळ', टेक ऑफ करण्यापूर्वी नातवाने केली खास घोषणा; इंडिगो पायलटच्या आईला आनंद अश्रू अनावर, पहा व्हिडिओ

इंडिगोचे पायलट प्रदीप कृष्णन यांनी नुकताच आपल्या कुटुंबाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चेन्नईला जाणाऱ्या फ्लाइटची क्लिप त्याच्या कुटुंबियांसोबत शेअर केली आहे. यामध्ये तो टेक ऑफ करण्यापूर्वी आई आणि आजोबांना भावनिक घोषणा करताना दिसत आहे.

IndiGo Pilot Viral Video (PC - Instagram)

Viral Video: अलीकडेच, चेन्नईहून कोईम्बतूरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचा (IndiGo Flight) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, जो लोकांना खूप भावूक करत आहे. या व्हिडिओमध्ये पायलट आपले आजी-आजोबा आणि आई या फ्लाइटमध्ये प्रवास करत असल्याची घोषणा करताना दिसत आहे. इंडिगोचे पायलट प्रदीप कृष्णन यांनी नुकताच आपल्या कुटुंबाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चेन्नईला जाणाऱ्या फ्लाइटची क्लिप त्याच्या कुटुंबियांसोबत शेअर केली आहे. यामध्ये तो टेक ऑफ करण्यापूर्वी आई आणि आजोबांना भावनिक घोषणा करताना दिसत आहे.

विशेष घोषणा करताना कृष्णन यांनी प्रवाशांना सांगितले की, माझे कुटुंब माझ्यासोबत प्रवास करत असल्याची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. माझी मावशी, वडील आणि आई 29 व्या रांगेत बसले आहेत. माझे आजोबा आज पहिल्यांदा माझ्यासोबत उड्डाण करत आहेत. तामिळ आणि इंग्रजीमध्ये घोषणा करत त्यांनी प्रवाशांना सांगितले की, मी आजोबांच्या TVS50 च्या मागच्या सीटवर अनेकदा प्रवास केला आहे, आता त्यांना राईड देण्याची माझी पाळी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pradeep Krishnan (@capt_pradeepkrishnan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now