Mukesh Ambani Ganesh Chaturthi Celebrations: मुकेश अंबानी यांच्या घरी धुमधडाक्यात साजरी झाली गणेश चतुर्थी; अनेक सेलेब्जनी लावली हजेरी (Watch Video)
आकाश-श्लोकाची मुलगी वेद आणि ईशा अंबानीची जुळी मुले आदिया आणि कृष्णा यांचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब उत्सुक असल्याचे दिसत आहे.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाचा सण गणेश चतुर्थी उत्साहात साजरी करण्यात आली. मुकेश अंबानी यांनी आज गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी अँटिलिया येथे गणपती बाप्पाचे स्वागत केले. यासाठी अँटिलिया बिल्डींग फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आली आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी ढोल-ताशांच्या गजरात 'अँटिलियाचा राजा'चे स्वागत करण्यात आले. यावेळचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये अंबानींच्या अँटिलियामध्ये खूप गर्दी दिसत आहे. यावेळी अनेक राजकारणासह बॉलीवूडमधील लोकही उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही कुटुंबासह मुकेश अंबानींच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते.
आकाश-श्लोकाची मुलगी वेद आणि ईशा अंबानीची जुळी मुले आदिया आणि कृष्णा यांचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब उत्सुक असल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Salman Khan ची बहिण Arpita च्या घरी बाप्पांचे आगमन; कुटुंबाने एकत्र साजरी केली गणेश चतुर्थी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)