Man Pulls Truck with Teeth: चक्क दातांनी ओढला तब्बल 15,730 किलो वजनाचा ट्रक; केला विश्वविक्रम (Watch)
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
इजिप्तच्या अश्रफ सुलेमानने एक नवा विक्रम केला आहे. त्याने सुमारे 15,730 किलो वजनाचा जड ट्रक चक्क त्याच्या दातांनी सहज ओढला आहे. यामुळे त्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये इजिप्तच्या रस्त्यांवर सुलेमान दातांमध्ये दोरी बांधून ट्रक ओढत असल्याचे दिसत आहे. गिनीज बुकनुसार, सुलेमानने 13 जून 2022 रोजी हा विक्रम केला होता.
Man Pulls Truck with Teeth Video-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)