Kanpur Temple Theft: आधी पूजा नंतर चोरी; कानपूरमध्ये शिवलिंगवरील पितळेच्या कलशाची चोरी (Watch Video)
कानपूरमध्ये एक व्यक्ती जल अर्पण केल्यानंतर शिवमंदिरातून पितळी भांडे चोरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Kanpur Temple Theft: सध्या चोर पैशांसाठी मंदिरातील देवांनाही सोडत नाहीत. कारण कानपूरमध्ये एकाने शिवलिंगाला जल अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरील पितळेचे भांडे चोरून (Shiva Temple Theft )नेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात चोर दुचाकीवरून मंदिरात येतो. दुचाकी मंदिराबाहेर पार्क करून मंदिरात प्रवेश करतो. इकडे-तिकडे पाहतो. काहीच मौल्यवान वस्तू दिसत नाहीत हे पाहून समोर असलेला पाण्याचा कलश तो त्याच्याकडे असलेल्या बॅगेत भरतो आणि पळून जातो.
कानपूरमध्ये शिवलिंगवरील पितळेच्या कलशाची चोरी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)