Maggot in Maggi: जबलपूरमध्ये तरुणाला मॅगी नूडल्समध्ये आढळले जिवंत किडे; व्हिडिओ व्हायरल, ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल (Watch)

अंकितने रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय ग्राहक मंचाच्या हेल्पलाइन क्रमांक 1800114000 वर कॉल करून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर मंगळवारी जबलपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी त्यांच्या घरी येऊन मॅगी नूडल्सचे नमुने घेतील, असे त्यांना सांगण्यात आले.

Screenshot of the video (Photo Credit: X/@niteshkumaragn4)

Maggot in Maggi: जबलपूरमधील एका ग्राहकाने दावा केला आहे की, एका किराणा दुकानातून विकत घेतलेल्या मॅगी नूडल्समध्ये जिवंत कीटक होते. नूडल्सची पॅकेजिंग तारीख मे 2024 होती आणि एक्सपायरी तारीख जानेवारी 2025 होती. मॅगीमध्ये किडे आढळल्यानंतर ग्राहकाने राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, नूडल्स पाण्यात टाकल्यावर जंत पाण्यावर तरंगू लागले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. माहितीनुसार, कटंगी परिसरात राहणाऱ्या अंकित सेंगरने तीन दिवसांपूर्वी पारस पतंजली स्टोअरमधून मॅगी नूडल्स खरेदी केले होते. ही मॅगी पाण्यात टाकल्यावर किडे तरंगू लागले. त्यानंतर त्याने किराणा दुकानदाराशी संपर्क साधला. दुकानदाराच्या सांगण्यावरून याशिवाय नेस्ले कंपनीची टीमही त्यांच्याशी संपर्क साधणार आहे.

दरम्यान, जून 2015 मध्ये, मॅगी नूडल्समध्ये अनुज्ञेय मर्यादेपेक्षा जास्त रसायने असल्याच्या आरोपामुळे देशभरात 6 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. परिणामी, कंपनीला 38,000 टन मॅगी नूडल्स परत मागवून नष्ट करावे लागले. नंतर, नोव्हेंबर 2015 मध्ये, बंदी शिथिल करण्यात आली आणि मॅगी नूडल्सची विक्री पुन्हा सुरू झाली. (हेही वाचा: UP Shocker: जन्माष्टमीच्या दिवशी पुऱ्या खाऊन पडले होते 250 जण आजारी; आता नमुना तपासणीत कुट्टूच्या पिठात आढळली प्राण्यांची विष्ठा आणि लघवी)

मॅगी नूडल्समध्ये आढळले जिवंत किडे-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now