Lalbaug cha Raja 2024 Gold Crown: लालबागचा राजा ला यंदा Anant Ambani यांनी दान केलेला 20 किलोचा सोन्याचा मुकूट विसर्जनापूर्वी चौपाटी वर उतरवला; पहा या क्षणाचा व्हिडिओ (Watch Video)
लालबागच्या राजा ला यंदा अनंत अंबानी यांनी 20 किलोचा आणि सुमारे 15 कोटी रूपयांचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता.
लालबागच्या राजा ला यंदा अनंत अंबानी यांनी 20 किलोचा आणि सुमारे 15 कोटी रूपयांचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता. दरम्यान विसर्जनाच्या वेळेस बाप्पाचे सारे दागिने काढण्यात आले त्यावेळेस हा सोन्याचा मुकूट देखील उतरवण्यात आला. बाप्पाच्या डोक्यावरील मुकूट विविध भाग सुटे करून उतरवण्यात आला आहे. क्रेन लावून कार्यकत्यांनी त्याचे वेगवेगळे भाग सुटे केले त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहेत. अनंत अंबानी सकाळी 6 च्या सुमारास गिरगाव चौपाटी वर पोहचले होते. तराफ्यावरून मूर्ती खोल समुद्रात नेऊन विसर्जन करताना अनंत अंबानी अन्य गणेशभक्तांसोबत जातीने तिथे हजर होते.
असा उतरवला लालबागच्या राजाचा सोन्याचा मुकूट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)