Gurugram Dog Attack Video: लॅब्राडोर जातीच्या पाळीव कुत्र्याचा अल्पवयीन मुलीवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद; व्हिडिओ व्हायरल
या हल्ल्यात ती जखमी झाली असली तरी थोडक्यात बचावली. ही घटना हरियाणाच्या (Haryana) गुरुग्राममधील (Gurugram युनिवर्ल्ड गार्डन सिटी-2, सेक्टर-4 येथे घडली. जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली.
लॅब्राडोर (Labrador Dog) जातीच्या पाळीव कुत्र्याने एका 12 वर्षीय मुलीवर हल्ला (Dog Attack in Gurugram) केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असली तरी थोडक्यात बचावली. ही घटना हरियाणाच्या (Haryana) गुरुग्राममधील (Gurugram युनिवर्ल्ड गार्डन सिटी-2, सेक्टर-4 येथे घडली. जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली जेव्हा मुलगी तिच्या आईसह त्यांच्या सोसायटीच्या तळमजल्यावर लिफ्टची वाट पाहत होती. दरम्यान, एक व्यक्ती आपला पाळीव कुत्रा घेऊन लिफ्टमधून बाहेर आला. लिफ्टमधून बाहेर येताच कुत्र्याने मुलीवर हल्ला केला. पीडितेची आई दिप्ती जैन यांनी पत्रकारांना सांगितले की, तिच्या मुलीने आणि सुरक्षा रक्षकाने तिला या हल्ल्यातून वाचवल्याने तिचा बचाव झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)