La Tomatina Festival 2024: स्पेनच्या बुनोल शहरात साजरा झाला वार्षिक 'ला टोमॅटिना' फेस्टिव्हल; एकमेकांवर फेकले गेले हजारो टोमॅटो (Watch Videos)

स्पॅनिश टोमॅटो फेस्टिव्हल, ‘ला टोमॅटिना’ म्हणून ओळखला जातो. हा अतिशय प्रसिद्ध आणि मनोरंजक उत्सव स्पेनच्या बुनोल शहरात साजरा केला जातो. या उत्सवात हजारो लोक जमतात आणि एकमेकांवर टोमॅटो फेकून या अनोख्या आणि मजेदार उत्सवाचा आनंद घेतात.

La Tomatina 2024 (Photo Credits: AFP)

La Tomatina Festival 2024: स्पेनमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या बुधवारी टोमॅटिना उत्सव साजरा केला जातो. यंदाही कालच्या बुधवारी स्पेनचे रस्ते लालेलाल झालेले दिसले. काल इथल्या लोकांनी पारंपारिक टोमॅटिना सण साजरा केला. एकमेकांवर टोमॅटो फेकून हा उत्सवा साजरा केला जातो. हा सण 1945 मध्ये मित्रांमध्ये मस्करी म्हणून केलेली, फूड फाइट म्हणून सुरू झाला आणि आता त्याला जागतिक स्वरूप आले आहे. दरवर्षी जगभरातून हजारो लोक या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी स्पेनला पोहोचतात. ही जगातील सर्वात मोठी फूड फाईट असल्याचे म्हटले जाते. या उत्सवात टोमॅटोशिवाय इतर काहीही फेकण्यास मनाई आहे.

स्पॅनिश टोमॅटो फेस्टिव्हल, ‘ला टोमॅटिना’ म्हणून ओळखला जातो. हा अतिशय प्रसिद्ध आणि मनोरंजक उत्सव स्पेनच्या बुनोल शहरात साजरा केला जातो. या उत्सवात हजारो लोक जमतात आणि एकमेकांवर टोमॅटो फेकून या अनोख्या आणि मजेदार उत्सवाचा आनंद घेतात. ला टोमॅटिना ट्रॅव्हल वेबसाइटनुसार, स्पॅनिश हुकूमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांनी धार्मिक महत्त्व नसल्यामुळे या उत्सवावर बंदी घातली होती. मात्र, 1957 मध्ये या निर्णयाच्या निषेधार्थ टोमॅटो दफन केले गेले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी ला टोमॅटिनाला परवानगी दिली आणि तो अधिकृत उत्सव बनला. पुढे 2002 मध्ये, स्पेनच्या पर्यटन सचिवांनी ला टोमॅटिना हा आंतरराष्ट्रीय पर्यटक हिताचा उत्सव घोषित केला. (हेही वाचा: Pakoda Wala Dipping Hand Into Boiling Oil: गरम उकळत्या तेलात हात घालून दुकानदार तळतोय भजी ,पाहा व्हिडिओ)

स्पेनच्या बुनोल शहरात साजरा झाला वार्षिक 'ला टोमॅटिना' फेस्टिव्हल-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now