Kuwait Car Crash: समुद्रकिनाऱ्यावर भरधाव कार चालवत स्टंटबाजी; तरूण थोडक्यात बचावला (Watch Video)

कुवेतमधील समुद्रकिनाऱ्यावर कार जोरदार रेठल्याचा स्ंटट(car driving stunt) आणि तो जीवावर बेतल्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यात तरूण कारमधून मोठ्या उंचावर उडून समुद्रात पडल्याचं दिसत आहे.

Photo Credit - Instagram

Kuwait Car Crash: नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, कुवेत (Kuwait) मधील समुद्रकिनाऱ्यावर कार चालवणारा एक तरूण मृत्यूच्या दारातून माघारी आल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकींचे चित्रण कैद करण्यात आले आहे. ज्यात समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळताना दिसत आहेत. दुसरीकडे, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटते आणि तरूण शेवटी कारच्या बाहेर फेकला जातो. त्यानंतर कारही पलटी होऊन समुद्राच्या किनाऱ्यावर आदळते. यात तरूणाला किरकोळ दुखापत झाल्याचे समजते आहे. (हेही वाचा :Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई )

 

View this post on Instagram

 

A post shared by Sach Kadwa Hai (@sachkadwahai)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement