Kota: 6 फुट कोब्राने घेतला रावठा रोड स्टेशनवरील रेल्वे अधिकाऱ्याच्या टेबलाचा ताबा; जाणून घ्या काय घडले पुढे (See Photo)
रेल्वे अधिकाऱ्याच्या टेबलावर सहा फुटांचा कोब्रा येऊन बसला
दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावरील कोटा विभागातील रावठा रोड स्थानकावरील पॅनेल रूममध्ये, रेल्वे अधिकाऱ्याच्या टेबलावर सहा फुटांचा कोब्रा येऊन बसला. अचानक हा साप आलेला पाहून स्टेशन मास्तर केदारप्रसाद मीना घाबरले. त्यानंतर केदारप्रसाद यांनी या घटनेची माहिती कोटा कंट्रोलरला दिली, जिथे उच्च अधिकारी ललित बौरसी यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली. त्यानंतर ललित यांनी सिग्नल पॅनलवर बसलेल्या या कोब्रा प्रजातीच्या सापाला सुखरूप बाहेर काढले. यानंतर स्टेशन मास्तर केपी मीना यांनी सिग्नल पॅनलचा ताबा घेतला आणि गाड्या चालवल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)