Viral Video: सिंगापूरच्या 'टिकटॉक'वर 'करीनाचा'हा डान्स होतोय व्हायरल
सिंगापूरच्या टिकटॉक (TikTok) व्हिडीओ बनवणाऱ्या काही मुलांनी एकत्र येत या गाण्यावर धमाल डान्स केला आहे.
'कभी खुशी कभी गम' (Kabhi Khushi Kabhie Gham) हा हिंदी चित्रपट कथानक आणि त्यातील गाण्यांमुळे आजही तितकाच प्रसिद्ध आहे. त्यामधील करीना कपूर (Kareena Kapoor) आणि ऋतिक रोशनवर (Hrithik Roshan) चित्रित झालेले 'बोले चुडिया' या गाण्याने तर अनेकांना वेड लावलं होतं. सिंगापूरच्या टिकटॉक (TikTok) व्हिडीओ बनवणाऱ्या काही मुलांनी एकत्र येत या गाण्यावर धमाल डान्स केला आहे. अगदी या गाण्यात ज्या प्रकारच्या स्टेप्स आहेत त्याच प्रकारच्या स्टेप्स या मुलांनी केल्या आहेत. आता हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून त्याचं अनेकांनी कौतुकही केलं आहे. या व्हिडीओत अगदी हुबेहुब स्टेप्स करण्यात आल्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)