Viral: 2,000 हून अधिक वेळा पोलिसांना कॉल केल्याबद्दल जपानी व्यक्तीला करण्यात आली अटक, काय काय संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
जपान येथे शुक्रवारी 2 डिसेंबर 2022 रोजी रात्री एका जपानी व्यक्तीला पोलिसांना त्रासदिल्याबद्दल आणि पोलिसांना 9 दिवसात 2,000 हून अधिक वेळा कॉल केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे, पुढे काय झाले जाणून घ्या
Viral: जपान येथे शुक्रवारी 2 डिसेंबर 2022 रोजी रात्री एका जपानी व्यक्तीला पोलिसांना त्रासदिल्याबद्दल आणि पोलिसांना 9 दिवसात 2,000 हून अधिक वेळा कॉल केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. जपानच्या सैतामा प्रीफेक्चरल पोलिसांनी सांगितले की, 67 वर्षीय व्यक्तीने 30 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या मुख्यालयात 2,060 वेळा फोन केला. SoraNews24 नुसार त्या व्यक्तीने पोलिसांना असेही सांगितले की, ते “कर चोर” आणि “मोठे मूर्ख गाढवे” आहेत. एकूण 27 तासांहून अधिक काळ या व्यक्तीने पोलिसांना शिवीगाळ केल्यामुळे, तो पोलिसांच्या कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे अटक करण्यात आली आहे.
28 नोव्हेंबर रोजी, त्याला अटक करण्यात आली आणि कथितरित्या ते म्हणाले, "मला माहित होते की, पोलिस कधीतरी मला अटक करायला येतील." या कॉल्समागील हेतू अद्याप समजू शकला नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)