Viral Video: चंदिगडमध्ये IAS Yashpal Garg यांनी CPR देऊन वाचवले हृदयविकाराच्या रुग्णाचे प्राण; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, Watch
चंदिगड गृहनिर्माण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यशपाल गर्ग यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचवले.
Viral Video: चंदिगड गृहनिर्माण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यशपाल गर्ग यांनी एका व्यक्तीचे प्राण वाचवले. सेक्टर 41-ए येथील जनक कुमार एका सुनावणीच्या संदर्भात सकाळी चंदीगड हाउसिंग बोर्डाच्या कार्यालयात पोहोचले होते. येथे सचिवांच्या चेंबरमध्ये सुनावणीदरम्यान खाली कोसळले. यानंतर IAS यशपाल गर्गने त्यांना कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) दिले. सुमारे 1 मिनिटाच्या सीपीआर प्रक्रियेनंतर जनक कुमार यांची प्रकृती चांगली झाली आणि त्यांना पाणी देण्यात आले.
त्यानंतर त्यांना तात्काळ चंदीगड हाऊसिंग बोर्डाच्या वाहनातून सेक्टर 16 जीएमएचमध्ये नेण्यात आले. वेळीच सीपीआर दिल्याने जनककुमार यांचे प्राण वाचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)