Hyderabad: बस न थांबवल्यामुळे दारूच्या नशेत असलेल्या महिलेने चालकावर फेकला साप

हैदराबादच्या नल्लकुंता विद्या नगरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे आरटीसी बस चालकावर महिलेने साप फेकला, नल्लाकुंटा पोलीस स्टेशन अंतर्गत विद्या नगर येथे एका महिलेने दारूच्या नशेत आरटीसी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. चालक बस न थांबवता निघून गेला. रागाच्या भरात एका महिलेने बसवर बिअरच्या बाटलीने हल्ला केला.

Hyderabad

Hyderabad: हैदराबादच्या नल्लकुंता विद्या नगरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे आरटीसी बस चालकावर महिलेने साप फेकला, नल्लाकुंटा पोलीस स्टेशन अंतर्गत विद्या नगर येथे एका महिलेने दारूच्या नशेत आरटीसी बस थांबविण्याचा प्रयत्न केला. चालक बस न थांबवता निघून गेला. रागाच्या भरात एका महिलेने बसवर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. त्यामुळे बसचा मागचा आरसा खराब झाला. चालकाने बस थांबवून महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु संतापलेल्या महिलेने बस चालकावर साप फेकला. दरम्यान, चालक घाबरून पळून गेला. आरटीसी चालकाच्या तक्रारीवरून नल्लाकुंटा पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now