Hotel Owner Death During Workout: जिममध्ये वर्कआऊट करताना हॉटेल मालकाला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणेही समोर येत आहेत.

Hotel Owner Death During Workout (PC - Twitter)

Hotel Owner Death During Workout: देशभरात जिम वर्कआऊट दरम्यान हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. असेच एक प्रकरण इंदूरमधून समोर आले आहे. येथे एका हॉटेल मालकाचा जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कोरोना संसर्गानंतर लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे जिममध्ये जाणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्याचबरोबर जिममध्ये हृदयविकाराच्या झटक्याची प्रकरणेही समोर येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्ड जिम, स्कीम क्रमांक 78 येथे ही घटना घडली, जिथे हॉटेल वृंदावनचे मालक प्रदीप रघुवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला. 55 वर्षीय प्रदीप यांना ट्रेडमिलवर चालत असताना अॅटक आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)