Himachal Pradesh: धावत्या बसवर कोसळला भलामोठा दगड, सिरमौर येथील घटनेत 2 जखमी (Watch Video)
हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात गिरी पार येथील एका गावाजवळ प्रवासी बसच्या छतावर महाकाय दगड कोसळल्याची घटना समोर आली आहे. यात घटनेत थोडक्यात बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. मात्र, दोन जण जखमी झाले आहेत.
Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील सिरमौर(Sirmaur)जिल्ह्यात, गिरी पार येथे प्रवासी बसच्या छतावर दगड पडल्याच्या घटनेत संभाव्य आपत्ती थोडक्यात टळली. सुदैवाने बसच्या छतावर दगड अडकल्याने बस रस्त्याच्या असलेल्या दरीकडे ढकलली गेली नाही. मात्र, दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेवेळी बसमध्ये 40 अमरनाथ यात्रेकरूंप्रवास करत होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी डोंगरावरून खाली तेय असताना अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणार्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर उडी मारून आपला जीव गमवावा लागला होता. (हेही वाचा:Amarnath Yatra 2024: जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित )
व्हिडीओ पहा
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)