Happy New Year 2025 Celebrations: जपान, सिंगापूरमध्ये नवीन वर्षे 2025 चे उत्साहात स्वागत; फटाक्यांच्या आतषबाजीने उजळली शहरे
सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये नवीन वर्ष सुरू झाले आहे. टोकियोतील तोकुदाई-जी मंदिरात घंटा वाजवून लोकांनी नवीन वर्षाचे पारंपारिक शैलीत स्वागत केले.
भारतात लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. मात्र त्याआधी जगातील अनेक देशांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली असून, मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन सुरु आहे. सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये नवीन वर्ष सुरू झाले आहे. टोकियोतील तोकुदाई-जी मंदिरात घंटा वाजवून लोकांनी नवीन वर्षाचे पारंपारिक शैलीत स्वागत केले. सिंगापूरमध्येही मोठ्या उत्साहात नवीन वर्ष साजरे केले जात आहे. दक्षिण कोरियामध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन साधे होते. याचे कारण म्हणजे 29 डिसेंबर रोजी झालेल्या विमान अपघातात देशातील 179 जणांचा मृत्यू झाला होता. सिडनी, मेलबर्न आणि ब्रिस्बेनख्या शहरांमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीने शहरे उजळून निघाली. (हेही वाचा: Happy New Year 2025: न्यूझिलंड मधील Auckland येथे Sky Tower वर फटाक्यांच्या आतषबाजीत नववर्षाचं दणक्यात स्वागत)
Happy New Year 2025 Celebrations:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)