गया रेल्वे स्थानकामध्ये GRP जवानांनी दोन महिलांना दिलं जीवनदान; CCTV मध्ये घटना कैद

महिलांना मदतीचा हात देत जीआरपी जवानांनीनी त्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे.

Gaya Station | Twitter

बिहारच्या गया मध्ये दोन महिला धावत्या रेल्वेखाली येता येता वाचल्या आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्म वर असलेल्या जीआरपीच्या प्रसंगावधानतेमुळे त्यांना जीवनदान मिळाले आहे. दोन महिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या या पोलिसाचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. ट्रेन मधून उतरताना त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या महिलांना मदतीचा हात देत जीआरपी जवानांनीनी त्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढलं आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now