Girls Fight Viral Video: रस्त्याच्या मधोमध भांडणाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण रस्त्यावर मुलींचे दोन गट एकमेकांशी भांडताना पाहिले आहेत का? तर बघा,  रस्त्याच्या मधोमध मुलींच्या दोन गटात भांडण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ उत्तराखंडमधील हल्दवानी जिल्ह्यातील आहे, जिथे रस्त्यावर मुलींच्या दोन गटांमध्ये जोरदार भांडण होत आहे. यादरम्यान मुली एकमेकांना मारहाण करताना आणि लाथा बुक्यांनी मारतांना दिसत आहेत. प्रियकरावरून मुलींच्या दोन गटात वाद झाला, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. राजमंगल टाइम्स नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शन लिहिले आहे- गर्ल्स फाईट, हल्द्वानी.

 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये रस्त्यावर मुलींच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसत आहे. मुली आपापसात भांडत आहेत. घटनेच्या वेळी, तेथून जाणारे लोक मुलींच्या भांडणाचे व्हिडिओ बनवू लागले, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)