Chain Snatching Video: आजी नातीने चेन स्नॅचर्सची खोड मोडली, पहा चोरट्यांना धु धु धुतानाचा व्हिडीओ
चेन स्नॅचर्सला एक आजी नातीने चांगलाचं धडा शिकवला आहे. चेन खेचून जाणाऱ्या चोरट्यांना नातीने बाईकवरुन खेचून त्यांची बाईक पाडली आणि मागे बसलेल्या चोरट्यास धु धु धुतला.
गेल्या काही दिवसांत चेन स्नॅचिंगच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. घरातून, बागेत, रस्त्यावर कुठेही अगदी हे चेन स्नॅचर्स डल्ला मारताना दिसतात. अशाचं चेन स्नॅचर्सला एक आजी नातीने चांगलाचं धडा शिकवला आहे. चेन खेचून जाणाऱ्या चोरट्यांना नातीने बाईकवरुन खेचून त्यांची बाईक पाडली आणि मागे बसलेल्या चोरट्यास धु धु धुतला. दरम्यान बाईक चालवणाऱ्या चोरट्याने बाईक सावरत तेथुन पळ काढला. पण ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठची घटना असुन गेले आठवड्याभरात घडलेली ही साम्य घटना आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)