OMG! मध्य प्रदेशातील Bakswaha मध्ये हातपंपातून पाण्यासह बाहेर फेकली जात आहे आग; विचित्र घटनेने ग्रामस्थांमध्ये उडाली खळबळ; Watch Viral Video

मिळालेल्या माहितीनुसार, हातपंपाला आग आणि पाणी बाहेर पडल्याची घटना जिल्हा मुख्यालयापासून 10 किमी अंतरावर असलेल्या कचार गावातील आहे. काही लोक रस्त्यावर फिरायला गेले असता हातपंपातून आग आणि नंतर पाणी येत असल्याचे दिसले. हे दृश्य पाहून त्यांच्या धक्का बसला.

Bakswaha Hand Pump Viral Video (PC - Twitter)

Bakswaha Hand Pump Viral Video: मध्य प्रदेशमधील छतरपूरच्या बक्सवाह तालुक्यातील कचार गावात बुधवारी रात्री उशिरा एक विचित्र घटना घडली. येथे एका हातपंपातून पाणी आणि आग एकाच वेळी बाहेर येऊ लागली. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हे दृश्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती. लोकांनी तातडीने यासंदर्भात प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. तपासानंतरच हा नेमका काय प्रकार आहे हे समजणे शक्य होईल. यापूर्वी अशी घटना येथे कधीच घडली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल झाला आहे.

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now