Fake News Alert: लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्क न बजावणार्यांच्या बॅंक खात्यातून 350 रूपये कापले जाणार? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाचा हक्क न बजावणार्या मतदारांना आर्थिक भुर्दंड पडणार असल्याच्या खोट्या बातम्या वायरल होत आहेत.
भारतामध्ये 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान 7 टप्प्यांमध्ये लोकसभेचं मतदान होणार आहे. यामध्ये मतदानाचा हक्क न बजावणार्या मतदात्यांच्या खात्यामधून 350 रूपये कापले जातील असा एक वायरल मेसेज फिरत आहे. पण हा दावा खोटा अससल्याचं पीआयबी फॅक्ट चेक कडून सांगण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)