Fact Check: तिरंगी रंगात उजळून निघालेल्या उड्डाणपुलाचा व्हिडीओ बोरिवलीच्या कोरा केंद्राचा नाही, जाणून घ्या सत्य (Watch)
मात्र आता माहिती मिळत आहे की, हा व्हिडीओ जयपूरच्या 22 गोडाऊन फ्लायओव्हरचा आहे.
भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभुमीवर देशात अनेक ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवला जात आहे. सध्या सोशल मिडियावर असे अनेक व्हिडीओज व्हायरल होत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला असून, तो बोरिवली पश्चिमेतील न्यू कोरा केंद्र उड्डाणपूलाचा असल्याचे सांगण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा उड्डाणपूल तिरंगी रंगात उजळून निघाला आहे. मात्र अशीही माहिती मिळत आहे की, हा व्हिडीओ जयपूरच्या 22 गोदाम फ्लायओव्हरचा आहे.
बोरिवली कोरा केंद्र फ्लायओव्हर म्हणून व्हायरल झालेला व्हिडीओ-
हा व्हिडीओ हैदराबाद येथील फ्लायओव्हरचा म्हणूनही व्हायरल झाला होता. याआधी BMC वॉर्ड RC ने हा व्हिडीओ बोरिवली कोरा केंद्र फ्लायओव्हरचा असल्याचे म्हणून ट्विट केले होते. त्यानंतर अनेक माध्यमांनी हा व्हिडीओ मुंबईचा असल्याचे सांगत त्यावर बातम्या केल्या. परंतु सत्य समोर आल्यानंतर BMC वॉर्ड RC ने ते ट्विट डिलीट केले.
Asusual spreading wrong info!! This is obviously not #Hyderabadhttps://t.co/GcK2oiBYUh is black in color
हा व्हिडीओ जयपूरच्या 22 गोदाम फ्लायओव्हरचा आहे-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)