Fact Check: बेंगळुरूमध्ये सुरु झाली Smooch Cab सेवा? शहराच्या रहदारीत जोडप्यांना मिळणार खासगी जागा? जाणून घ्या काय आहे सत्य

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 'स्मूच कॅब्स' आता कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. ही सेवा जोडप्यांसाठी खासगी जागा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे.

Smooch Cab Now Available in Bengaluru? (Photo Credits: X/@Kulfei)

भारतातील टेक हब म्हणून ओळखले जाणारे बेंगळूरू शहर सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या ठिकाणी चक् स्मूच कॅब्स सुरु झाल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, 'स्मूच कॅब्स' आता कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये कार्यरत आहेत. ही सेवा जोडप्यांसाठी खासगी जागा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. बेंगळूरूच्या कायमच्या वाहतूक कोंडीत अडकलेल्या जोडप्यांना या कॅब्समध्ये गडद टिंटेड खिडक्या आणि आवाजरोधक सुविधांसह रोमांटिक क्षणांचा आनंद घेता यावा, असा या सेवेचा हेतू असल्याचे सांगितले जात आहे.

पोस्टमध्ये म्हटले आहे, ‘'आम्हाला @SchmoozeX ची स्मूच कॅब दिसली ??????!!!😭 आतमध्ये नक्की काय घडले ते मला सांगता येणार नाही, मात्र या कॅबच्या गोपनीयतेसाठी मी त्याला 10/10 देईन.' त्यावर या पोस्टला प्रतिसाद देताना, मीम-आधारित डेटिंग ॲप Schmooze म्हटले, 'तुमच्यासाठी ही कॅब आताच बुक करा, फक्त 1 एप्रिलपर्यंत वैध.' या उत्तरावरून दिसून येते की, हे एप्रिल फूलचे प्रँक होते.

Smooch Cab Service Launched in Bengaluru? 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement