Fact Check: भांडणादरम्यान भररस्त्यात पँट उतरवणारी 'ती' महिला कोण? व्हायरल व्हिडिओतील सत्यता काय? घ्या जाणून

सायकल रिक्षाचालकासोबत झालेल्या भांडणात भररस्त्यामध्ये स्वत:ची पँट उतरवून पुरुषासोबत हाणामारी करणाऱ्या एका कथीत महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ जूनाच असून व्हिडिओत पँट उतरवताना दिसत असलेली व्यक्ती ही महिला नसून ट्रान्सजेंडर आहे.

Transgender | Photo Credit: X

सायकल रिक्षाचालकासोबत झालेल्या भांडणात भररस्त्यामध्ये स्वत:ची पँट उतरवून पुरुषासोबत हाणामारी करणाऱ्या एका कथीत महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ जूनाच असून व्हिडिओत पँट उतरवताना दिसत असलेली व्यक्ती ही महिला नसून ट्रान्सजेंडर आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बुडाऊन येथील बारी बायपास येथील घडलेल्या एका प्रसंगाचा आहे. ज्यामध्ये चांदनी नावाची ट्रान्सजेंडर व्यक्ती आणि ई-रिक्षा चालक अनमोल गुप्ता यांच्यात झालेल्या भांडणाचे चित्रण व्हिडिओमध्ये पाहायला मिळते.

चांदनी आणि गुप्ता यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. हा वाद पुढे अधिक वाढला आणि हाणामारीपर्यंत पोहोचला. याच प्रसंगादरम्यान, चांदणीने आपली पँट उतरवली आणि हाणामारी सुरु केली. दरम्यान, सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या दाव्यामध्ये तथ्यनसून या हाणामारीत कोणत्याही महिलेचा सहभाग नव्हता. महिलासदृश्य दिसणारी व्यक्ती ट्रान्सजेंडर चांदणी आहे.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now