Fact Check: मोबाईल वापरकर्त्यांना सरकार देणार 28 दिवसाचा मोफत रिचार्ज? व्हायरल मेसेजचे सत्य घ्या जाणून

केंद्र सरकार सर्व मोबाईल वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी मोफत मोबाईल रिचार्ज देणार असल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकार 'मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम' अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे.

Mobile Recharge Fact Check

सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकार सर्व मोबाईल वापरकर्त्यांना 28 दिवसांसाठी मोफत मोबाईल रिचार्ज देणार असल्याचा दावा केला आहे. केंद्र सरकार 'मोफत मोबाईल रिचार्ज स्कीम' अंतर्गत 28 दिवसांसाठी सर्व वापरकर्त्यांना 239 रुपयांचे फ्री रिचार्ज देत आहे. मेसेजमध्ये लोकांना रिचार्जसाठी लिंकवर क्लिक करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अशा मोफत रिचार्जचा लाभ कधी पर्यंत घेऊ शकाल याची माहितीही मेसेजमध्ये देण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने त्याची चौकशी केली. ज्यामध्ये असे आढळून आले की व्हायरल होत असलेला मेसेज पूर्णपणे खोटा आहे. त्यामुळे अशा कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेऊ नका.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement