Fact Check: आता फार्मासिस्ट देखील सुरु करू शकणार स्वतःचे क्लिनिक? जाणून घ्या व्हायरल संदेशामागील सत्य

फार्मासिस्ट आता स्वतःचे दवाखाने सुरु करून रुग्णांवर डॉक्टरांप्रमाणे उपचार करू शकतील. याबाबत सरकारनेही मान्यता दिल्याचा दावा वृत्तात केला जात आहे.

Representational Image | (Photo Credits: File Image)

सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की, आता मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या फार्मासिस्टना डॉक्टरांसारखा दर्जा मिळणार आहे. म्हणजेच फार्मासिस्ट आता स्वतःचे दवाखाने सुरु करून रुग्णांवर डॉक्टरांप्रमाणे उपचार करू शकतील. याबाबत सरकारनेही मान्यता दिल्याचा दावा वृत्तात केला जात आहे. हा संदेश मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर फिरू लागल्यावर पीआयबी फॅक्ट चेकने या दाव्याची सत्यता पडताळली आणि त्यामध्ये हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. पीआयबीने हा दावा फेटाळून लावला असून, भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement