Dolly Chaiwala: डॉली चायवालाची हवा! एका इव्हेंटसाठी 5 लाख, लक्झरी हॉटेल्सची मागणी (Watch Viral Video)
कुवेतमधील एका फूड व्लॉगरने डॉली चायवालाला एका कार्यक्रमासाठी बुक करण्याचा त्याचा अनुभव शेअर केला. डॉली चायवाला कार्यक्रमात हजेरीसाठी संबंधितांकडून ५ लाखांच मानधन घेतो. त्याशिवाय, लक्झरी हॉटेल्समध्ये राहतो.
Dolly Chaiwala: बिल गेट्सला चहा देऊन आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेला नागपूरचा चहा विक्रेत डॉली चायवालाची आता मोठा हवा पहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एका फूड व्लॉगरने (AK Food Vlog) अलीकडेच डॉली चायवालाला कुवेतमधील एका कार्यक्रमासाठी बुक करण्याचा त्याचा अनुभव शेअर केला आहे. डॉली चायवालाच्या मागणीने व्लॉगर हैराण झाला. एका पॉडकास्टमध्ये, फूड ब्लॉगरने उघड केले की एक दिवसाच्या हजेरीसाठी, डॉली चायवालाने 2,000 दिनार (अंदाजे 5 लाख रुपये किंवा 2,500 KD) शुल्क मागितले. त्याशिवाय, 4 किंवा 5-स्टार हॉटेल बुकिंगची शर्त ठेवली. "मी माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू लागलो," असे फूड व्लॉगर क्लिपमध्ये म्हणताना दिसतो.
डॉली चायवालाची हवा, एका इव्हेंटसाठी 5 लाखांची बोली
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2024 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

