Dog Attack Video: संगारेड्डी जिल्ह्यात 6 भटक्या कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, पहा धक्कादायक व्हिडिओ (Watch)

ही घटना संगारेड्डी जिल्ह्यातील श्रीनगर कॉलनीमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका सहा वर्षांच्या मुलावर जवळजवळ सहा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

Stray Dog Attack

Dog Attack Video: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी घराबाहेर खेळणाऱ्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मुल गंभीर जखमी झाले. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती घटनास्थळी पोहोचला आणि त्याला कुत्र्यांपासून वाचवले. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाही भटक्या कुत्र्यांनी एका मुलावर हल्ला करून त्याला ठार केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आताची घटना संगारेड्डी जिल्ह्यातील श्रीनगर कॉलनीमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका सहा वर्षांच्या मुलावर जवळजवळ सहा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक मृत्यू आणि जखमींची उच्च न्यायालयानेदेखील गंभीर दखल घेतली आहे. (हेही वाचा: Chhapra Lady Doctor: नगरसेवकाचे लिंग कापले, लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरचे कृत्य; कथीत Live-in Relationship चा कठोर अंत)

पहा व्हिडिओ- 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement