Dog Attack Video: तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी घराबाहेर खेळणाऱ्या मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मुल गंभीर जखमी झाले. मुलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून एक व्यक्ती घटनास्थळी पोहोचला आणि त्याला कुत्र्यांपासून वाचवले. त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीलाही भटक्या कुत्र्यांनी एका मुलावर हल्ला करून त्याला ठार केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, आताची घटना संगारेड्डी जिल्ह्यातील श्रीनगर कॉलनीमध्ये घडली आहे. या ठिकाणी एका सहा वर्षांच्या मुलावर जवळजवळ सहा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक मृत्यू आणि जखमींची उच्च न्यायालयानेदेखील गंभीर दखल घेतली आहे. (हेही वाचा: Chhapra Lady Doctor: नगरसेवकाचे लिंग कापले, लग्नास नकार दिल्याने महिला डॉक्टरचे कृत्य; कथीत Live-in Relationship चा कठोर अंत)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)