'कंडोम पण हवाय का?' मुलीच्या सॅनिटरी पॅड्सच्या प्रश्नावर बिहारच्या IAS अधिकारी Harjot Kaur Bamhrah यांचे अजब उत्तर (Watch Video)
मुलीने विचारले होते की, सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का?
बिहारच्या महिला व विकास महामंडळाच्या अध्यक्षा व बाल प्रबंध संचालक हरजोत कौर यांचे एक वादग्रस्त वक्यव्य समोर आले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे मुलींच्या जनजागृतीसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुलींचाही सहभाग होता. आता या कार्यशाळेत एका मुलीच्या प्रश्नाला वरिष्ठ महिला आयएएस अधिकाऱ्याने दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे. मुलीने विचारले होते की, सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का?
मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना वरिष्ठ महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर म्हणाल्या- 'मागणीचा अंत नाही. आज तुम्ही म्हणाल सरकार 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? उद्या तुम्ही जीन्स पँट मागाल, परवा म्हणाल सरकार शूज का देऊ शकत नाही? त्यानंतर जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा सरकारला निरोध देखील विनामूल्य द्यावा लागेल.' कौर यांच्या या उत्तराचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)