Crocodile on Shivnadi Bridge: शिवनदी पुलावर मगरीचा मुक्त वावर, व्हिडिओ व्हायरल (Watch)

चिपळून येथील शिव नदी पाक्षामध्ये मगरींची संख्या वाढत आहेत. या मगरींचा स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी चिपळून नगरपरिषद आणि वनविभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असले तरी स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांपैकी कोणीही लक्ष न घातल्याने मगरींचा त्रास स्थानिकांना होत आहे.

Crocodile on Shivnadi Bridge

चिपळून येथील शिव नदी पाक्षामध्ये मगरींची संख्या वाढत आहेत. या मगरींचा स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी चिपळून नगरपरिषद आणि वनविभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. असे असले तरी स्थानिक प्रशासन आणि वनविभाग यांपैकी कोणीही लक्ष न घातल्याने मगरींचा त्रास स्थानिकांना होत आहे. तसेच, नागरिकांमध्ये भीतीचेही वातावरण आहे.

नागरिकांच्या भीतीमध्ये भर घालणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ चिपळून येथील शिवनदी पुलावरील असल्याचे समजते. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक भलीमोठी मगर पुलावररील रस्त्यावर मुक्तपणे फिरत आहे. ज्यामुळे नागरिकामंध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे. एका एक्स वापरकर्त्याने या मगरीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो व्हयरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता. (हेही वाचा, Crocodile Feast: श्वानांना भक्ष बनवणाऱ्या मगरीची आदीवासींकडून फिस्ट; 11 फूट लांबीच्या मगरीचे मटण करून खाल्ले)

व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement