Cockroach In Cold Coffee: मुंबईमध्ये ग्राहकाला कोल्ड कॉफीमध्ये आढळले झुरळ; Hope & Shine Lounge Hotel च्या स्टाफविरुद्ध मालाड पोलिसांत गुन्हा दाखल
त्यांनी दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनाही कॉफी कडू वाटली म्हणून त्यांनी वेटरला साखर घालायला सांगितली. वेटरने ग्लास बार काउंटरवर नेला, साखर टाकली आणि कॉफी पुन्हा रावत आणि त्याच्या मित्राला दिली.
Cockroach In Cold Coffee: मुंबईच्या होप अँड शाइन लाउंज हॉटेलमध्ये एका ग्राहकाला आपल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली होती. त्यानंतर आता मालाड पोलिसांनी होप अँड शाइन लाउंज हॉटेलशी संबंधित व्यवस्थापक, एक वेटर आणि इतर व्यक्तींविरुद्ध खाद्यपदार्थ किंवा पेयामध्ये भेसळ केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणी प्रतीक रावत, 25, या ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे कलम 125 (इतरांचा जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य), 274 (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेय पदार्थात भेसळ करणे), 275 (हानीकारक अन्न किंवा पेय विक्री) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस अहवालानुसार, तक्रारदार रावत हा अंधेरी पश्चिम येथील लोखंडवालामध्ये राहतो आणि एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चावतो. रावत 30 ऑगस्ट रोजी, रात्री 9.30 वाजता, आपल्या मित्रासह मालाड पश्चिम, लिंक रोड, इन्फिनिटी मॉल समोर, सॉलिटर बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या होप आणि शाइन लाउंज येथे गेला होता. त्यांनी दोन कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनाही कॉफी कडू वाटली म्हणून त्यांनी वेटरला साखर घालायला सांगितली. वेटरने ग्लास बार काउंटरवर नेला, साखर टाकली आणि कॉफी पुन्हा रावत आणि त्याच्या मित्राला दिली. मात्र त्यानंतर रावतला ग्लासमध्ये झुरळ सापडले. रावतने लगेच ग्लासचा फोटो काढला, आणि या प्रकरणाबाबत मालाड पोलिसांकडे तक्रार केली. (हेही वाचा: Worms in Cadbury Daily Milk Chocolate: कॅडबरी चॉकलेटमध्ये आढळली अळी; ग्राहकाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा)
मुंबईमध्ये ग्राहकाला कोल्ड कॉफीमध्ये आढळले झुरळ-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)