Cobra Viral Video: सरकारी बसमध्ये सापडला तब्बल सहा फूट लांब कोब्रा; प्रवाशांची उडाली तारांबळ (Watch)

शनिवारी दुपारी 3 वाजता बस चिक्कबल्लापुरा येथून निघाली, त्यावेळी एका प्रवाशाला बसमध्ये त्याच्या सीटखाली साप दिसला.

Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

कर्नाटकातील सिडलघट्टाजवळ चालत्या सरकारी बसमध्ये तब्बल सहा फूट लांब कोब्रा सापडला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक सर्पमित्र या कोब्राला बसमधून बाहेर काढत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी 3 वाजता बस चिक्कबल्लापुरा येथून निघाली, त्यावेळी एका प्रवाशाला बसमध्ये त्याच्या सीटखाली साप दिसला. त्याने तातडीने याची माहिती कंडक्टरला दिली. त्यानंतर चालकाने बस थांबवली आणि प्रवाशांना घाबरून न जाता बस खाली करण्यास सांगितले. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनीही या घटनेची माहिती अधिकार्‍यांना दिली, त्यानंतर एका स्थानिक सर्पमित्राने या सापाला बसमधून बाहेर काढून जंगलात सोडून दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement