Bizarre Nail Art: नेल आर्टिस्टने टॉर्टिला आणि कोथिंबीरच्या पानांचे केले मॅनिक्युअर, सोशल मीडियातील युजर्स संतापले
पण तुम्हाला टोस्टेड ब्रेडचा तुकडा, कोथिंबीर आणि टकीलाचा एक लहान ग्लास असलेले मॅनिक्युअर आवडेल का?
मॅनिक्युअर म्हणजे नखे आकारात कापून त्यावर सुंदर नेलपेंट आणि आर्ट करणे आणि लोकांना ते खूप आवडते. पण तुम्हाला टोस्टेड ब्रेडचा तुकडा, कोथिंबीर आणि टकीलाचा एक लहान ग्लास असलेले मॅनिक्युअर आवडेल का? तर मॅनिक्युअरसाठी ब्रेड, कोथिंबीर आणि टकीला वापरणाऱ्या नेल आर्टिस्टच्या व्हिडिओमुळे लोक आनंदी होण्याऐवजी संतप्त झाले आहेत. लॉस एंजेलिस आणि युक्रेन शाखेसह रशियन-आधारित सलून नेल सनी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेल आर्टिस्ट टोस्टेड टॉर्टिला ब्रेड, कोथिंबीर, एक छोटा ग्लास नखांना लावताना दिसत आहे.
Video:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)