Birthday Boy Face Caught Fire: केक कापताना फोम स्प्रे आणि फायर गन यांच्यासोबत मस्ती, बर्थ डे बॉय चा चेहरा पेटला; सुदैवाने किरकोळ जखमांवर निभावली दुर्घटना (Watch Video)

रितिक वानखेडे असं आग लागलेल्या मुलाचं नाव होतं. सुदैवाने त्याला मोठी जखम झालेली नाही. सध्या या बर्थ डे सेलिब्रेशन मधील अपघाताचा व्हिडिओ वायरल होत आहे.

Fire | Twitter

आजकाल वाढदिवस हे सोहळे झाले आहेत. त्यामध्ये सेलिब्रेशन करताना पैशांची  वारेमाप उधळपट्टी करताना फायर गनचा वापर, फोम स्प्रे वापरला जातो. वर्ध्यात यामधून मस्करीची कुस्करी झाली आणि बर्थ डे बॉयचा चेहरा पेटला. त्याने तातडीने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. ही दुर्घटना जीववर बेतली नाही पण नाक, कानाला जबर जखमा झाल्या. त्याला नजिकच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फायर गन मधील ठिणगी पडल्याने ही आग पेटल्याचं समोर आलं आहे. Mumbai Police: वाढदिवसाचा केक तलवारीने कापला; मुंबई पोलिसांनी बड्डे बॉयला कायद्याचा हिसका दाखवला .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement