Bihar Shocker: बीडीओच्या फेअरवेल पार्टीत महिलेचा अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएमने दिले चौकशीचे आदेश (Watch)
सर्व अधिकारी या अश्लील नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.
बिहारच्या खगरिया जिल्ह्यातील बेलदौर ब्लॉक ऑफिस कॉम्प्लेक्समधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. इथे बीडीओ सुनील कुमार यांच्या बदलीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये बार गर्ल्सने भोजपुरी गाण्यांवर अश्लील डान्स केला आहे. या डान्सच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्स आणि समोर आलेल्या व्हिडिओनुसार, या ‘बार गर्ल्स’ला फेअरवेल पार्टीत भोजपुरी गाण्यावर नृत्य करण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला बेलदौर झोनच्या सीओसह अनेक अधिकारी उपस्थित होते. सर्व अधिकारी या अश्लील नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डीएमने चौकशीचे आदेश दिले. हा व्हिडिओ 12 जुलैचा असल्याचे सांगण्यात येत आहे. पार्टीत उपस्थित अधिकारी आणि सरकारी कर्मचारी संध्याकाळपर्यंत नाचत असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, पार्टी आयोजित करण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती किंवा सूचना देण्यात आली नव्हती. (हेही वाचा: Poonam Pandey Dance Video: पूनम पांडेच्या किलर डान्स स्टेप्सने सोशल मीडियावर लावली आग; Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)