वांद्रे मध्ये अभिनेत्री Raveena Tandon ची वृद्ध महिलेला मारहाण? पीडित कुटुंबाचा पोलिस स्टेशन मध्ये अभिनेत्री नशेत असल्याचा दावा (Watch Video)

रिझवी कॉलेज परिसरात रविना टंडनच्या ड्रायव्हरने एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप तिच्या कुटुंबाकडून करण्यात आला आहे.

Raveena Tandon | X

मुंबई मध्ये वांद्रे भागात अभिनेत्री रविना टंडनच्या (Raveena Tandon) ड्रायव्हरने एका महिलेवर गाडी घातल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर एका मुलीला आणि त्या वृद्ध महिलेला देखील अभिनेत्रीने मारहाण केल्याचा दावा एका व्यक्तीने केला आहे. वायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये आपण खार पोलिस स्टेशन मध्ये जाऊन या प्रकाराची नोंद केल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान यामध्ये आपण न्यायाची अपेक्षा करत असल्याचं म्हटलं आहे. वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये रविना टंडनच्या ड्रायव्हरला स्थानिकांनी मारहाण करताच अभिनेत्री त्याला सोडण्याचं आवाहन करताना दिसली आहे. Minor Drives BMW With Man On Bonnet: अल्पवयीन मुलाच्या हातात BMW चं स्टेअरिंग अन गाडीच्या बोनेट वर बसून मज्जा लुटणार्‍या व्यक्तीचा व्हिडिओ वायरल; कल्याण मधील घटना ( Watch Video) .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now